Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

खेड : व्हिडिओकॉलवर औषधाची गोळी दाखवल्यानंतर तरुणाचा काही वेळातच संशयास्पद मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील सवेणी वळणवाडी येथे एका २५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूच्या काही वेळेपूर्वी संबंधित तरुणाने आपल्या पत्नीला व्हिडीओकॉलद्वारे हातात औषधाची एक पांढऱ्या रंगाची गोळी दाखवली होती.

काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, पोलिसांनी घटनास्थळी आकस्मिक मृत्यूची नोंद करत शवविच्छेदनासाठी शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला आहे.


कृष्णा एकनाथ पवार (वय २५, रा. सवेणी, वळणवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. दि. ५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी झाडांची नर्सरीमधून आपल्या पत्नीला मोबाईलवरून व्हिडीओकॉल केला होता. यावेळी त्यांनी हातात एक पांढऱ्या रंगाची गोळी दाखवली व कॉल कट केला. काही वेळातच ते घरी परतले.


पत्नीने गोळीबाबत विचारले असता, “तुला काय करायचंय?” असे म्हणत त्यांनी रागाने उत्तर दिले. त्यानंतर दोघे आणि मुलगा चहा पिऊन बसले. अचानक कृष्णा यांनी पत्नी आणि मुलाला जवळ घेतले आणि “मला आता जगायचं नाही” असे बोलून खाली कोसळले. ही घटना पाहून पत्नीने घाबरून मिठाचे पाणी दिले; मात्र उलटी झाली नाही. नंतर त्यांनी मामाला बोलावून घेतले आणि रिक्षाने कृष्णा यांना उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे नेण्यात आले.

मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, शवविच्छेदनासाठी मृतदेहाचा नमुना राखून ठेवण्यात आला आहे. खेड पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद (गु.र.क्र. ७२/२०२५) भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत कृष्णा पवार यांच्या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *