Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : घरात घुसून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, दहा जणांविरोधात खेड पोलिसांत गुन्हा

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कशेडी सुतारवाडी येथे घरात घुसून पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दहा जणांच्या टोळक्याने लाठ्या, काठ्या, पाईप, दगड आणि कोयते यांसारखी हत्यारे घेऊन हल्ला केल्याचा आरोप असून, या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ७ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कशेडी सुतारवाडी येथे घडली. मात्र, या घटनेप्रकरणी २१ जुलै २०२६ रोजी अधिकृतपणे गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी सीमा सुरेश दरेकर यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, त्या आणि त्यांचे पती घरामध्ये घरगुती काम करत असताना आरोपी अचानक लाठ्या, काठ्या, लोखंडी पाईप, दगड आणि कोयते घेऊन त्यांच्या घरात घुसले. आरोपींनी दोघांनाही जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या हल्ल्यात पती-पत्नीला दुखापत झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली.

तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी चंद्रकांत नारायण दरेकर, उज्वला चंद्रकांत दरेकर, मनीष चंद्रकांत दरेकर, राजेश्री राजेश दरेकर, रघुनाथ मोरे, उर्मिला रघुनाथ मोरे (सर्व रा. कशेडी सुतारवाडी, ता. खेड), तसेच विक्रांत चंद्रकांत दरेकर, प्राची विक्रांत दरेकर, तेजस मुकेश दरेकर (मूळ रा. कशेडी सुतारवाडी, सध्या मुंबई) आणि सुप्रिया प्रशांत पाटील (मूळ रा. कशेडी सुतारवाडी, सध्या खेड) अशा एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *