Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

खेड : धामणंद येथे डोहात बुडून वृद्धाचा मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील धामणंद येथे घरामागील डोहात बुडून एका ६९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. महेश चंद्रकांत सुर्वे असे मृत वृद्धाचे नाव असून, ते धामनंद येथील एस.टी. स्टँडजवळ राहत होते.

बुधवारी पहाटे ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१० जून) दुपारी १२.३० ते ४.३० च्या दरम्यान ही घटना घडली. महेश सुर्वे हे घरातून बाहेर पडले होते.

त्यांचा मुलगा सातबारा आणण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला होता. घरी परतल्यावर महेश सुर्वे दिसून न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. घराच्या मागील बाजूस असलेल्या नदीकडे गेले असावेत, असा विचार करून शोध घेतला असता, नदीच्या डोहाच्या किनारी ते पाण्यावर तरंगताना आढळून आले.

या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. बुधवारी रात्री २.२५ वाजता या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *