Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

खेड : भटक्या कुत्र्यांचा दोन महिलांवर हल्ला

banner 468x60

खेड नगरपरिषद हद्दित मोकाट कुत्र्यांचा वावर रोखण्यासाठी नगरप्रशासनाने निर्बिजीकरणाची मोहीम राबवत ५०० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरणही केले होते. मात्र पुन्हा भटक्या कुत्र्यांचा वाढला आहे. भटक्या कुत्र्यांनी दोन महिलांवर हल्ला केल्याची बाब समोर आली आहे.

यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरप्रशासनाने पुन्हा निर्बिजीकरणाची मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी मोकाट कुत्र्यांच्या वावराने नागरिक अक्षरशः मेटाकुटीस आले होते. नगरप्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर २० मार्चपासून नगरपरिषद हद्दीत निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली होती.

५०० मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर मोहीम थांबवण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी येत असल्याने पालक धास्तावले आहेत. मोकाट कुत्र्यांनी दोन महिलांवर हल्ला केल्याची बाब देखील समोर आली आहे.

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः मंदिराच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा उच्छाद पुन्हा वाढल्याने भाविकही धास्तावले आहेत. नगरप्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेवून पुन्हा निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *