Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू

खेड : बैलांसह 4 लाखांची व्हॅनही जप्त, खेड पोलिसांची कारवाई

banner 468x60

खेड तालुक्यातील काडवली-केळणे मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन बैलांची बेकायदेशीररित्या वाहतूक करणारी बोलेरो पिकअप व्हॅन ग्रामस्थांच्या मदतीने पकडली. नितीन गंगाराम चव्हाण (35 रा. आंबडस-खेड) याला ताब्यात घेण्यात आले. 20 हजार रूपये किंमतीच्या दोन बैलांसह 4 लाखांची बोलेरो पिकअप व्हॅन पोलिसांनी हस्तगत केली.


नितीन चव्हाण हा बोलेरो (एम.एच. 11 बी.एल. 3431) पिकअप व्हॅनमधून दोन बैलांची बेकायदेशीरपणे वाहतूक करत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच सापळा रचला. या बाबत वावे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे यांना खबर दिल्यानंतर सहकाऱ्यांसमवेत काडवली-केळणे मार्गावर पोहचले.

या मार्गावर बोलेरो पिकअप व्हॅनची पोलिसांनी झडती घेतली असत आढळले. संशयिताकडे विचारणा केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी दोन बैलांसह बोलेरो व्हॅन जप्त करत येथील पोलीस ठाण्याच्या आवारात आणली. आवारातील एका झाडाखाली बांधून ठेवण्यात आलेल्या दोन्ही बैलांची तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. बैलांना पाणी व चाराही देण्यात आला.


बेकायदेशीरपणे बैलांची वाहतूक केल्याचा ठपका ठेवत पोलीस कॉन्स्टेबल विशाल भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयितावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *