Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

संगमेश्वर : शेतात काम करताना कुऱ्हाडीचा घाव लागल्याने वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू, संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे येथील घटना

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे गावातील खालची घुगवाडी येथे शेतातील काम करताना पायावर कुऱ्हाडीचा घाव लागल्याने गंभीर जखमी झालेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बाईत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत वृद्धाचे नाव तुकाराम गंगाराम बाईत (वय ६५, रा. हरपुडे, खालची घुगवाडी, ता. संगमेश्वर) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम बाईत हे त्यांच्या स्वमालकीच्या शेतात काजूच्या झाडांना खत घालण्याचे काम करत होते. काम सुरू असताना अचानक कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या पायावर बसला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या जखमेवर टाके घालून आवश्यक उपचार केले. प्रकृती स्थिर असल्याचे वाटल्याने उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, घरी परतल्यानंतर जेवण झाल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना पुन्हा तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने आवश्यक कार्यवाही केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुकाराम बाईत यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनामुळे हरपुडे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *