मंडणगडमध्ये इमारतीच्या छतावर मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा, दोघांविरोधात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आदर्श नगर परिसरातील एका इमारतीच्या छतावर मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालून नागरिकांना त्रास देणाऱ्या दोन तरुणांविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

banner 728x90

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आदर्श नगर येथील एका इमारतीच्या छतावर काही तरुण मद्यप्राशन करून गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.

या प्रकरणी अभि राकेश शिंदे (वय २०, रा. दिवा, ठाणे) याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्र. ८८/२०२६ तसेच सोहम सुनील टेमकर (वय २१, रा. दिवा (पूर्व), ठाणे) याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्र. ८९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपी हे मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या दोन्ही प्रकरणी पोलीस शिपाई अमित बाळासो भोसले (बकल क्रमांक ४२४) यांनी फिर्याद दिली असून मंडणगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *