दापोली : साठवणुकीतील धान्यावरील किडींच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

banner 468x60

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत “हरितसंगिनी” विद्यार्थी गटाच्या वतीने कोळथरे येथे साठवणुकीतील धान्यावरील किडी व त्यांचे व्यवस्थापन या विषयावर शेतकरी जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

banner 728x90

या कार्यक्रमात साठवणुकीदरम्यान धान्यावर आढळणाऱ्या विविध किडींची ओळख, त्यांच्यामुळे होणारे नुकसान तसेच धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक शास्त्रीय उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

धान्य साठवण्यापूर्वी ते योग्य प्रकारे वाळवणे, साठवणुकीची जागा स्वच्छ व कोरडी ठेवणे, कोठाराचे निर्जंतुकीकरण करणे आणि शास्त्रीय साठवण पद्धतींचा अवलंब करणे याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली. तसेच प्रात्यक्षिकाद्वारे किडींची ओळख व त्यांच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना प्रत्यक्ष दाखविण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. डी. शिर्के, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, डॉ. थोरात, डॉ. शिगवण, डॉ. राऊत, डॉ. दोसाणी, डॉ. तोरणे आणि डॉ. गुडदे यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमात धनश्री चौगुले, श्रावणी कालेकर, साक्षी वालपकर, श्रद्धा कोतवाल, विशाखा आंबवले, यशिका करकेरा, अनया वराडकर, सानिका नाकील, अनुजा साळुंखे, सिद्धी धनावडे, सानिया पासिलकर, दिया म्हादये, सृष्टी पुरी आणि श्रावणी आरेकर या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला.

या जनजागृती उपक्रमामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये साठवणुकीतील धान्याचे किडींपासून संरक्षण, शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती आणि सुरक्षित साठवण तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *