Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

गुहागर : अखेर गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची मुंबईत बदली, कथित ऑडिओ क्लिपमुळे होते चर्चेत

banner 468x60

गुहागर : शृंगारतळी येथील मारहाण प्रकरणानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची अखेर मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने हा बदली आदेश जारी करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे १ ऑगस्ट रोजी रात्री दोन तरुणांच्या गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर गुहागर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला.

मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले ते पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या या कथित क्लिपमध्ये मारहाण करणाऱ्या तरुणांच्या कृत्याचे समर्थन केल्याचा आरोप करण्यात आला. या कथित संभाषणामुळे नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नसली तरी या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस कायद्यातील तरतुदींनुसार पोलीस आस्थापना मंडळाने सचिन सावंत यांची मुंबई शहर येथे बदली करण्याचा निर्णय घेतला. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित घटकप्रमुखांनी त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, तसेच विहित मुदतीत नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शृंगारतळी येथील मारहाण प्रकरण, त्यानंतर व्हायरल झालेला व्हिडिओ, कथित ऑडिओ क्लिप आणि आता झालेली बदली या घटनांमुळे गुहागर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते. पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर या प्रकरणावर पडदा पडणार की पुढे आणखी प्रशासकीय किंवा चौकशीसंदर्भातील घडामोडी घडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *