Breaking News
रत्नागिरी : विषारी औषध सेवन केलेल्या करबुडे येथील 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू संगमेश्वर : एसटी स्थानकाजवळ पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा मृत्यू रत्नागिरी : ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघांना अटक, 2.40 लाखांचा मुद्देमाल जप्त, कोकणनगर-शिवरेवाडी मार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई चिपळूण : पालकमंत्री उदय सामंत आज चिपळूण दौऱ्यावर, वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचा घेणार आढावा, दुपारी शासकीय विश्रामगृहात विशेष बैठक रत्नागिरी : शहराचा दर सोमवारी पाणीपुरवठा बंद, पाणी कपातीचे धोरण पुन्हा लागू, शीळ धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

गुहागर : कोंड कारुळ येथे जागतिक वन दिन साजरा

banner 468x60

गुहागर (वार्ताहर) उत्कर्ष युवक मंडळ कोंड कारुळ, श्री आविष्कार मंडळ दिवाणतड वाडी व जि.प.शाळा कोंड कारुळ बो-या ता.गुहागर जि.रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिनानिमित्ताने वृक्ष लागवड व पर्यावरण जनजागृती करण्यात आली.

वनपरिमंडळ अधिकारी श्री.मुरलीधर गोविंद जागकर यांचे प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांसह कोंड कारुळ गावामध्ये रॅली काढून जन माणसांत वन विषयक जनजागृती व्हावी याकरिता काही वन बाबत घोष वाक्ये देणेत आली.

सन २०२४-२५ या वर्षी शालेय हिवाळी क्रिडा स्पर्धेत जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावरील विविध खेळात नैपुण्य दाखविणा-या विद्यार्थ्यांचे हस्ते कोंड कारुळ येथील बंदर रस्त्यावर पर्यावरण पुरक वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या वृक्ष लागवड व पर्यावरण जनजागृती उपक्रम रॅली मध्ये कोंड कारुळ गावचे विद्यमान सरपंच सौ.निलीमा प्रताप अडूरकर ,श्री आविष्कार मंडळ दिवाणतड वाडीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्री.सुदर्शन अडूरकर व सेक्रेटरी श्री.संतोष जागकर व कोंड कारुळ बो-या जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.माने सर व इतर शिक्षक वृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *