Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

गुहागर : मुसळधार पावसाचा फटका; गुहागर-अंजनवेल मुख्य रस्ता खचला, तातडीने दुरुस्तीची मागणी

banner 468x60

गुहागर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुहागर-अंजनवेल मुख्य रस्त्याला मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचला असून भराव वाहून गेल्याने रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

banner 728x90

गुहागर आणि अंजनवेलला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरून होत असते. मात्र रस्ता खचल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *