Breaking News
दापोलीच्या साक्षी पाते यांचा महाराष्ट्रात डंका, ‘AWPL’ कडून ‘काठमांडू-नेपाळ’ टूर बहुमान पटकावला रत्नागिरी : जयगड समुद्रात इंधनाचा मोठा साठा जप्त, ‘शहाना’ बोटीसह पाच जण ताब्यात चिपळूण : गाडी बाजूला घ्या” म्हणताच वाद, चिपळूणात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून मारहाण, पार्किंगच्या कारणावरून हिंसक हल्ला, बाळू चव्हाण आणि सुयोग चव्हाण दोघांविरोधात गुन्हा दाखल दापोली-खेडमधील वीज समस्यांवर उपाययोजना; नवीन विद्युत उपकेंद्रांसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी दापोली : वारंवार वीज खंडिततेमुळे नागरिक संतप्त, महावितरण कार्यालयावर धडक आंदोलनाचा इशारा

गुहागर : शासकीय वाळू डेपोवरील कामगारांना मारहाण;एकास अटक

banner 468x60

गुहागर तालुक्यातील भातगाव येथील शासकीय वाळू डेपोवरील ३ कामगारांना ते झोपेत असताना त्यांच्या खोलीत प्रवेश करून चौघांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी घडली.

banner 728x90


या प्रकरणी गुहागर पोलिसांनी विराज विजय कदम (३२, भातगाव, तिसंग) याला शनिवारी अटक करण्यात आली असून पसार झालेल्या तिघांचा शोध सुरू आहे.
वाळू व्यवहारातील रकमेवरून वाद झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले.


भातगाव तिसंग येथील शासकीय वाळू डेपोवरील क्रेन ऑपरेटर मोहन गणपत महतो (४३), निलकंठ महतो, धनु महतो हे तिघे कामगार असून १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास भातगाव तिसंग येथील खोलीवर जेवण करून झोपले होते.


२० रोजी रात्री १ च्या सुमारास या तिघांना चौघांनी येऊन दांडक्याने मारहाण करत जखमी करून काळोखात पसार झाले.


या तीनही कामगारांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात त्या ४ अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


तर आरोपींपैकी विराज कदम यांना २२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.
त्याला न्यायालयात हजर केले असता २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *