Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

गुहागर : बायपास मार्गावर अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील गुहागर बायपास मार्गावर दुचाकी घसरून गंभीर जखमी झालेल्या प्रदीप नारायण लिबे (वय 47, रा. कामथेखुर्द-हरेकरवाडी) यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिबे हे चिपळूण येथील जिप्सी कॉर्नर हॉटेलमध्ये कामाला होते. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी ते हॉटेलमालक शेटय़े यांची दुचाकी घेऊन कामथे-हरेकरवाडी येथे जात असताना, गुहागर बायपास मार्गाजवळ दुचाकीवरील ताबा सुटून ती घसरली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच 4 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *