Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

संगमेश्वरमध्ये इंजिनिअर तरुणाची सव्वा दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक

banner 468x60

सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आपला डाव साधत संगमेश्वर तालुक्यातील एका इंजिनिअर तरुणाची तब्बल २ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. बँक खात्यांमधून परस्पर ऑनलाईन व्यवहार करून ही रक्कम लंपास करण्यात आली असून, याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशांक प्रकाश सावंत (वय ३५, रा. नावडी, ता. संगमेश्वर) हे पेशाने इंजिनिअर असून एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. ३० मे ते १ जून २०२६ या कालावधीत अज्ञात सायबर भामट्याने त्यांच्या बँक खात्यांवर डल्ला मारत मोठी आर्थिक फसवणूक केली.

सायबर गुन्हेगाराने प्रथम बँक ऑफ इंडिया, संगमेश्वर शाखेतील त्यांच्या खात्यातून दोन स्वतंत्र व्यवहारांद्वारे ९५ हजार रुपये आणि ८० हजार रुपये असे एकूण १ लाख ७५ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने वळवले. त्यानंतर त्याने जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे – संगमेश्वर शाखेतील खात्यालाही लक्ष्य करत त्यामधून आणखी ५० हजार रुपये काढून घेतले.

अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून एकूण २ लाख २५ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आल्याने शशांक सावंत यांना मोठा आर्थिक फटका बसला. खात्यातील व्यवहार तपासताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून खात्यांची माहिती घेतली आणि संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे संगमेश्वर पोलिसांनी १२ जून २०२६ रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (सी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

प्राथमिक तपासात आरोपीने बँक खात्याची गोपनीय माहिती, डिजिटल बँकिंगचा गैरवापर किंवा अन्य सायबर माध्यमांचा वापर करून ही फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नेमकी कोणत्या पद्धतीने रक्कम वळविण्यात आली, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

दरम्यान, वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बँक खाते क्रमांक, एटीएम कार्डची माहिती, सीव्हीव्ही क्रमांक, ओटीपी, नेट बँकिंग पासवर्ड किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, तसेच संशयास्पद लिंक, कॉल किंवा संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *