दीपावली सणाचे औचित्य साधून दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश धुमाळ यांनी नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी विशेष दिवाळी सदिच्छा उपक्रम राबविला. नगरपंचायतीच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दिवाळीनिमित्त भेट देत सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दापोली नगरपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात सफाई कामगारांपासून ते कार्यालयीन कर्मचारी आणि विविध विभागांतील कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.
शहराची स्वच्छता, नागरी सुविधा आणि प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी हे कर्मचारी सातत्याने मेहनत घेत असतात. त्यांच्या याच कामाची आणि योगदानाची दखल घेत मुख्याधिकारी महेश धुमाळ यांनी कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधत त्यांना दिवाळीची भेट दिली.
कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करणे आणि त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मुख्याधिकारी धुमाळ यांनी यावेळी नमूद केले.
मुख्याधिकाऱ्यांनी दिवाळीनिमित्त दाखविलेल्या या आपुलकीमुळे नगरपंचायतीच्या कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणाऱ्या या उपक्रमाचे कर्मचारी वर्गातून स्वागत करण्यात आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













