दापोली : मटका जुगारावर रत्नागिरी LCBची कारवाई, मुद्देमाल जप्त, बुरोंडी नाका परिसरात छापा

banner 468x60

दापोली शहरातील बुरोंडी नाका परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कारवाई केली. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रसाद नथुराम घोडे (वय ५५, रा. काळकाई कोंड, दापोली) याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दापोली शहरातील बुरोंडी नाका परिसरात एका टपरीच्या बाजूला मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.


या कारवाईदरम्यान प्रसाद घोडे याच्याकडे मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडून २ हजार ३६० रुपये रोख रक्कम तसेच जुगाराच्या नोंदी असलेले साहित्य व इतर वस्तू असा एकूण २ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रुपाली यादव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *