Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

रत्नागिरी : साखरपा येथे डिझेल टँकर पलटी, चालक जखमी, मोठा अनर्थ टळला

banner 468x60

साखरपा, ता. 28 रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी जवळ गोवरेवाडी बस थांब्याजवळ आज दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास डिझेलने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात चालक जखमी झाला असून मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश आनंदा पवार (वय ३९, रा. बेडग, ता. मिरज, जि. सांगली) हे एमएच १० सीआर ५१८४ क्रमांकाचा टँकर मिरजहून रत्नागिरी एसटी डेपोकडे डिझेल घेऊन जात होते. मुर्शी पोलीस चौकीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर अचानक पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की टँकर रस्त्याच्या कडेला उलटून पडला आणि त्यातील डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहू लागले.

अपघातानंतर काही वेळ परिसरात घबराट पसरली होती. डिझेल सांडल्यामुळे आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ खबरदारी घेत परिसर सुरक्षित केला. काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच देवरुख येथील पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी कुर्ले-पावसकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेणुका कांबळे तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

जखमी चालक सुरेश पवार यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, रस्त्यावर सांडलेल्या डिझेलमुळे वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला होता. पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने रस्ता स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना केल्या. काही वेळानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *