Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

दापोली : विहिरीत पडलेल्या मगरीला बाहेर काढून जाळलं, जिवंत मगरीला ठार मारून जाळणाऱ्याचा शोध सुरू

banner 468x60

दापोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती तुषार महाडीक, सर्पमित्र (वाकवली, ता. दापोली) यांनी ९ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता वन विभागाला भ्रमणध्वनीद्वारे कळवली.

या माहितीनुसार, प्र. ग. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी (दापोली), वनरक्षक सुरज जगताप, शुभांगी भिलारे, शुभांगी गुरव आणि विश्वंभर झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


पाहणी दरम्यान, कोरड्या विहिरीत मगर आढळली नाही. आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली असता, विहिरीपासून दक्षिण दिशेला ५० मीटर अंतरावर लाकडे पेटताना दिसली.


बारकाईने पाहणी केल्यावर आगीत मगर जळत असल्याचे आढळले. आग विझवून मगरीचा आगीत जळालेला आणि तोंडाचा शिल्लक भाग तपासासाठी ताब्यात घेण्यात आला.
शुभांगी रा. भिलारे, वनरक्षक (ताडील) यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवला. पुढील तपास सुरू आहे.


वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास किंवा अशा घटना घडल्यास नागरिकांनी वन विभागाचा टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ७४९९५७५७८९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पी. जी. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी (दापोली) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *