प्रतिनिधी- सागर गोवळे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) उपक्रमाअंतर्गत ‘कृषी स्नेही’ समूहाच्या विद्यार्थिनींनी वणोशी तर्फ पंचनदी येथे आंबा छाटणी (Pruning) विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला. राम काटविलकर यांच्या आंबा बागेत झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या बागेत ५० आंबा झाडे असून उपस्थित शेतकऱ्यांकडे मिळून सुमारे ८० ते ९० आंबा झाडे आहेत. त्यामुळे या प्रशिक्षणाचा लाभ स्थानिक आंबा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

विद्यार्थिनींनी आंबा छाटणीची शास्त्रशुद्ध पद्धत प्रत्यक्ष दाखवत प्रकाश व हवेचा योग्य प्रवेश, झाडांची निरोगी वाढ, किडी-रोगांचा कमी प्रादुर्भाव तसेच फळांच्या गुणवत्तेत होणारी वाढ यामध्ये छाटणीचे महत्त्व स्पष्ट केले. प्रशिक्षण (Training), छाटणी (Pruning) आणि पुनरुज्जीवन (Rejuvenation) यांतील फरक समजावून सांगत थिनिंग, हेडिंग बॅक, डी-टॉपिंग, पिंचिंग आणि गर्डलिंग या आधुनिक तंत्रांचीही माहिती देण्यात आली.
यावेळी प्रूनिंग सॉ, सेकॅटर आणि प्रूनिंग शिअर्स या अवजारांचा सुरक्षित वापर प्रत्यक्ष दाखवून देण्यात आला. तसेच आंबा बागेत आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवता येईल, याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रश्नोत्तर सत्रात शेतकऱ्यांनी छाटणीची योग्य वेळ, प्रमाण, आंतरपिकांची निवड आणि छाटणीनंतर घ्यावयाची काळजी यासंदर्भातील शंकांचे निरसन करण्यात आले.
या उपक्रमासाठी समृद्धी जाधव, नीलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ, श्रावणी मोरे आणि आकांक्षा गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. महेश कुलकर्णी तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रात्यक्षिकामुळे वणोशी परिसरातील आंबा उत्पादकांमध्ये शास्त्रीय तंत्रांविषयी जागरूकता निर्माण झाली असून आधुनिक व शाश्वत फळबाग व्यवस्थापनाला चालना मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













