Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

दापोली : वनोशी तर्फे नातू गावात जनावरांचा गोठा कोसळला

banner 468x60

दापोलीत दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने दि २६ रोजी पहाटे ६ वाजता तालुक्यातील वानोशी तर्फे नातू येथील चंद्रकांत शंकर चव्हाण यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा कोसळला.

या गोठ्यात एकूण सहा जनावरे होती. त्या पैकी एक गाय दगावल्‍याची घटना घडली आहे. तर पाच जनावरे ही जखमी झाली आहेत.

या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस पाटील सुरज चव्हाण यांनी तातडीने जेसीबी आणि त्यांचे मजूर आणि गावकऱ्यांच्या मदतीने अन्य जनावरांना वाचविले आहे. या बाबतची माहिती स्थानिक तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली आहे.

त्यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेत चव्हाण यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जनावरांची वैरण पावसात भिजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *