दापोलीत मद्यसेवन करून भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवत स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चालकाविरोधात दापोली पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास दापोली केळस्कर नाका तसेच दापोली शहरातील सार्वजनिक रस्त्यावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार नंदकुमार राणे (वय ३०, रा. जालगाव लष्करवाडी, ता. दापोली, मूळ रा. पंचनदी राणेवाडी, ता. दापोली) हा एमएच ०८ बीई ७६०८ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ईको कार चालवत होता. त्याने मद्यसेवन करून वाहन ताब्यात घेतले आणि दापोली शहरातील सार्वजनिक रस्त्यावर हयगई व बेदरकारपणे वाहन चालवून स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण केला.
दरम्यान, पोलिसांकडून सुरू असलेल्या नाकाबंदीच्या कारवाईत संबंधित चालक पोलिसांच्या निदर्शनास आला. तपासणीदरम्यान त्याने मद्यसेवन केले असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सुरेश मडके (बक्कल क्रमांक २४७), दापोली पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली. गुन्हा १३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.४६ वाजता दाखल करण्यात आला असून, दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













