Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

दापोली : सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या

banner 468x60

दापोली तालुक्यात हादरवणारी घटना समोर आली आहे. दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विनोद गणपत तांबे (वय 36, रा. उन्हवरे बौद्धवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

या घटनेमुळे गावात आणि आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भावाने धारदार शस्त्राने आपल्या सख्ख्या भावावर हल्ला केला. या हल्ल्यात भावाचा जागीच मृत्यू झाला.

शनिवारी मध्यरात्री हा खून करण्यात आला असल्याचे बोलले जात असून दापोली पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. भावाने भावाचा खून का केला याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या खुनाचा तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, कुटुंबातील वाद किंवा जमीन-संपत्तीचा वाद या पाश्र्वभूमीवर ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *