दापोली : नॅशनल हायस्कूल मांदिवलीचा दहावीचा निकाल 100% , मुदब्बीर मेहबूब मुकादम याने 80% गुण घेऊन प्रथम

banner 468x60

दि यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवलीचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आनंदाचे वातावरण होते. कारण या ही वर्षी दहावीचा निकाल 100% लागला.

banner 728x90

मुदब्बीर मेहबूब मुकादम याने 80% गुण घेऊन प्रथम, अनस उमर मुजावर हा 75.04% घेऊन दुसरा तर मुफीद मुन्नवर मुकादम हा 73% गुण घेऊन शाळेत तिसरा आला. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक फैयाज सर यांचे संस्था अध्यक्ष उस्मान मालवणकर, उपाध्यक्ष डाॅ.अजीज सावंत,

सचिव अ.कादीर खांचे, सहसचिव अस्लम जुवळे, शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम, सदस्य जमालुददीन मुकादम, गुलाम हुसैन भारदे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मेहबूब मुकादम व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *