दापोली : नगरपंचायतीत क्रांतीस्तंभाला अभिवादन, क्रांतीदिन उत्साहात साजरा

banner 468x60

९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून दापोली नगरपंचायतीच्या प्रांगणातील क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण केली.

banner 728x90

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट या दिवसाला विशेष महत्त्व आहे. ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या स्मृती जागविणाऱ्या या दिवशी दापोली नगरपंचायतीत क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाला अभिवादन केले.


या कार्यक्रमास दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, आरोग्य सभापती जया साळवी, प्रशासकीय अधिकारी सारंग कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक श्रीकृष्ण पेठे उपस्थित होते.

तसेच स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग फाटक यांचे सुपुत्र डॉ. शिरीष फाटक, स्वातंत्र्यसेनानी शिवराम मुरकर यांचे सुपुत्र विजय मुरकर, सैन्यदलातून निवृत्त झालेले राजेंद्र शिगवण यांच्यासह दापोली शहरातील नागरिक, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *