Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

दापोली : महिलेच्या शेतात घुसून 1 लाखांचं झाडांचे नुकसान, संतोष कालेकर आणि सरपंचावर गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील करंजाणी येथे एका महिलेच्या मालकीच्या शेतीत अनधिकृतपणे प्रवेश करून झाडांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक ५ जुलै रोजी दुपारी २ वाजण्यापासून ते २१ जुलै संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी करंजाणी (मावळतवाडी) येथील रहिवासी वैजयंती रघुनाथ कालेकर (वय ४०) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांच्या फिर्यादीनुसार बिपिन पाटणे (रा. दापोली), संतोष दत्ताराम कालेकर (रा. करंजाणी), तसेच करंजाणी ग्रामपंचायतीचे सध्याचे सरपंच (संपूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही) यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून हेतुपुरस्सर झाडांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.


फिर्यादीतील माहितीनुसार, आरोपींनी इंटरनेट व वाय-फायची वायर काजू, आंबा, दालचिनी, कोकम आणि ऐन या झाडांना बांधल्यामुळे या झाडांचे कायमस्वरूपी नुकसान झाले. एकूण नुकसानाचा अंदाज सुमारे एक लाख रुपये इतका असून हे नुकसान दीर्घकालीन स्वरूपाचे असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी आरोपी बिपिन पाटणे, संतोष कालेकर व सरपंच यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 अंतर्गत कलम 329(3), 324(5), आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *