दापोली : होमगार्ड पथकाकडून हरित महाराष्ट्रासाठी वृक्षारोपण कार्यक्रम

Screenshot

banner 468x60

दापोली : राज्य शासनाच्या “हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” या महत्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने दापोली होमगार्ड पथक कार्यालय आवारात २१ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

Screenshot

banner 728x90

या उपक्रमाचे मार्गदर्शन पथक समादेशक अधिकारी राजेश राजवाडकर यांनी केले. यावेळी पथकातील तब्बल ३६ होमगार्ड उत्साहाने सहभागी झाले.

कार्यक्रमाचा शुभारंभ पथकातील होमगार्ड तेजस भारदे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर होमगार्ड जवानांनी एकत्रितपणे विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

या वृक्षारोपणामुळे परिसरात हिरवाई वाढून “हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप मिळणार असल्याचे अधिकारी व उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *