Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

दापोली : अमली पदार्थ प्रकरणात तिसरा आरोपी अखिल अब्बास होडेकरला अटक

banner 468x60

दापोली पोलिसांनी समुद्रकिनारी सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणी कारवाईचा वेग कायम ठेवत तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर 2025 रोजी केळशी समुद्रकिनारी अज्ञात अमली पदार्थ सापडल्याने गुन्हा क्र. 143/25 अंतर्गत NDPS कायद्यान्वये चौकशी सुरू होती. यापूर्वी अखिल होडेकर (वय 49) आणि अब्रार डायरी (वय 32), दोघेही केळशी किनारा मोहल्ला येथील रहिवासी, यांना अटक करण्यात आली होती.

चौकशीतून उघड झाले की, या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अखिल अब्बास होडेकर (वय 49, रा. केळशी उंबरशेत) चरस विक्री प्रकरणात सहभागी असून, त्याने अब्रार डायरी याला मदत केली होती. त्या आधारावर पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.


पोलिसांचे आवाहन: समुद्रकिनारी कुठल्याही संशयास्पद हालचाली, पॅकेट्स किंवा वस्तू दिसल्यास त्वरित दापोली पोलिसांना कळवा. तुमची माहिती गुप्त ठेवली जाईल.
दापोली पोलिसांच्या दक्षतेमुळे या प्रकरणात सलग तिसरी अटक झाली असून, अमली पदार्थविरोधी मोहिमेला यश मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *