दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण

banner 468x60

दापोली तालुक्यातील जालगाव येथील विद्यार्थ्याने दहावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. ग्रामपंचायत जालगावचे ग्रामविकास अधिकारी सतीश साळवे यांचे चिरंजीव अर्पण सतीश साळवे याने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८.८० टक्के गुण मिळवत उज्ज्वल यश मिळवले.

अर्पणने आपल्या मेहनतीच्या जोरावर सर्व विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून मराठी, इंग्रजी आणि गणित या महत्त्वाच्या विषयांत शंभर पैकी शंभर गुण मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या या यशामुळे जालगाव गावाच्या शैक्षणिक वैभवात आणखी भर पडली आहे.

या यशाबद्दल जालगाव शिवसेना शाखेतर्फे अर्पणचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, शाखाप्रमुख मयूर मोहिते, उपशाखाप्रमुख योगेश साटम, युवासेना उपशाखाप्रमुख रचित पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अर्पणच्या या यशामागे त्याचे पालक तसेच सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, जालगाव येथील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले आहे. त्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *