Breaking News
दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार

दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

banner 468x60

दापोली तालुक्यातील आघारी-भुंडावड परिसरात 54 वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद दाभोळ पोलिस ठाण्यात BNSS कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव विनोद विश्राम काष्टे (वय ५४ वर्षे, रा. आघारी, पोस्ट पंचनदी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद काष्टे हे २३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास आघारी-भुंडावड परिसरात ते पडलेल्या अवस्थेत आढळून आले.

त्यांच्यामध्ये कोणतीही हालचाल होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. मात्र, तपासणीनंतर २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता विनोद विश्राम काष्टे यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार दाभोळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ११/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेची अधिकृत नोंद २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३९ वाजता करण्यात आली.

विनोद काष्टे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांकडून घटनेची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व संबंधित अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *