दापोली : प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त 24 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

banner 468x60

दापोली पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यावर कारवाई करत २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


banner 728x90

ही कारवाई रविवारी (२८ जून) सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास दापोली-मंडणगड मार्गावरील आंबा पॉईंट येथील काळ्या वडापाव विक्री दुकानासमोर करण्यात आली.

याप्रकरणी कृष्णा नारायण गवळी (वय ६०, रा. पांढरेवाडी स्टॉप, स्वामी व्हिला, दापोली) यांच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल मधुकर सोनबा चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण २४ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. यात केसरयुक्त विमल पान मसाल्याच्या १,२१० पुड्या (किंमत २१,७८० रुपये) तसेच सुगंधित तंबाखूच्या १,२१० पुड्या (किंमत २,४२० रुपये) असा साठा आढळून आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवणे व विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून आरोपीने जाणीवपूर्वक हा साठा बाळगल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *