दापोली तालुक्यातील बुरोंडी गणाच्या पंचायत समिती सदस्या अंकिता घुबडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, गेली अनेक वर्षे बंद असलेली दापोली–बुरोंडी–शीतलनगर एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांचा प्रवासाचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
ही बससेवा बंद असल्यामुळे बुरोंडी, शीतलनगर व परिसरातील ग्रामस्थांना शिक्षण, नोकरी, आरोग्य सेवा तसेच दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत पंचायत समिती सदस्या अंकिता घुबडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित विभागाकडे वारंवार मागणी केली.
ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर एसटी प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत दापोली–बुरोंडी–शीतलनगर बससेवा पुन्हा सुरू केली. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
या पाठपुराव्यात पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे तसेच पंचायत समितीतील सर्व सहकाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे अंकिता घुबडे यांनी सांगितले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी भविष्यातही अशाच पद्धतीने प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अनेक वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या या एसटी सेवेचा लाभ विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













