दाभोळ : दाभोळ सागरी पोलिसांनी विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करत एकूण ३ हजार ९०० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई २७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मळे-भोपण फाटा येथे करण्यात आली.
या प्रकरणी दिलीप गोविंद खळे (वय ६०, रा. भोपण हरेकरवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याच्याविरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना दारू विक्री करण्याच्या उद्देशाने मद्यसाठा बाळगल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान मास्टर डिलाईट प्रीमियम व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १४ सीलबंद बाटल्या, ९० मिलीच्या ९ सीलबंद बाटल्या तसेच लंडन पिलस्नर प्रीमियम स्ट्रॉंग बिअरच्या ५०० मिलीच्या ८ टिन असा एकूण ३ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दैवत दिलीप राणे (बक्कल क्रमांक ९३७) यांनी फिर्याद दिली. गुन्ह्याची नोंद २७ सप्टेंबर रोजी रात्री ११.२३ वाजता करण्यात आली असून, पुढील तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













