दापोली तालुक्यातील मौजे ओणी येथील बौद्धवाडी फाट्यानजीक सार्वजनिक रस्त्यावर डंपर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ जुलै २०२६ रोजी दुपारी १.१४ वाजण्याच्या सुमारास आगरवायंगणी ते ओणी मार्गावर एमएच-०८-एच-१४६६ क्रमांकाचा डंपर सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे उभा करण्यात आला होता की, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तसेच पादचारी आणि इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला.
या प्रकरणी देवानंद शालीकराम बोरकर (पोलीस कर्मचारी, दाभोळ सागरी पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश महिपत पवार (वय ४९, रा. आगरवायंगणी, पवारवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दाभोळ सागरी पोलीस ठाणे करीत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













