Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

दाभोळ दापोली रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प, वाहतूक पूर्ववत

banner 468x60

दाभोळ दापोली रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. लाठीमाळ ते उंबर्ले दरम्याने सैतवडेकर बागेजवळ झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

आज २६ जुलै शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दाभोळ दापोली रस्त्यावरील लाठीमाळ ते उंबर्ले दरम्यान सैतवडेकर बागेजवळ झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.


स्थानिक लोकं, आशुतोष साळुंखे पंचनदी हायस्कूलचे शिक्षक, अजय वायंगणकर,अर्चना मकू, तेरेवायंगणी प्रशालेचे शिक्षक प्रशांत पांदे, अंकुर चव्हाण व इतर अनेक प्रवासी, शालेय विद्यार्थी यांनी झाडं रस्त्यातून बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी झाडं बाजूला करण्यासाठी दाभोळ येथील एस.टी.कंडक्टर शुभम देवाळे , ड्रायव्हर व प्रवासी यांनीही शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे एक तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *