Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : गेल्या 18 तासांपासून जगबुडी नदीत वाहून गेलेल्या कंटेनर चालक बेपत्ता, जगबुडी नदीतील शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदी पुलावरून काल (२२ जुलै) सायंकाळी सुमारे ६:३० वाजता नदीत कोसळलेल्या कंटेनर ट्रकच्या चालकाचा शोध अद्यापही सुरू आहे. अपघाताला १८ तासांहून अधिक काळ लोटला असला तरी चालकाचा अद्याप शोध लागलेला नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक कंटेनरच्या केबिनमध्येच अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र नदीतील वेगवान प्रवाह, वाढलेली पाण्याची पातळी आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे कंटेनरच्या केबिनचा पत्रा कापून चालकापर्यंत पोहोचण्याच्या कामात बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), स्थानिक प्रशासन, खेड शहरातील विसर्जन कट्टा बचाव पथक, मदत ग्रुप तसेच स्थानिक स्वयंसेवक युद्धपातळीवर शोध व बचावकार्य करत आहेत. चालकापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असून बचाव मोहिमेला वेग देण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून चालकाचा सुखरूप शोध लागावा, अशी प्रार्थना नागरिकांकडून केली जात आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सध्या जगबुडी नदीतील या बचाव मोहिमेकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *