चिपळूण : वैतरणा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील पाली येथील परटवणे डोहात वैतरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. विजय बळवंत महाडीक ( ४८, रा. पाली मधलीवाडी) असे दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६.१५ वाजेच्या दरम्यान विजय महाडीक हे परटवणे डोहात पोहण्यासाठी गेले होते. गावातील प्रकाश शिवाजी महाडीक यांनी त्यांना नदीत उतरताना पाहिले. मात्र, विजय हे बराच वेळ बाहेर न आल्याने प्रकाश यांनी त्यांना आवाज दिला. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी गावात येऊन इतरांना माहिती दिली.

गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. अथक प्रयत्नानंतर विजय महाडीक यांचा मृतदेह वैतरणा नदीच्या पात्रात परटवणे डोहात मध्यभागी बुडालेल्या अवस्थेत आढळून आला.

या घटनेमुळे पाली गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *