Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू

चिपळूण : महावितरणच्या 90 हजारांच्या विद्युत तारांची चोरी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील वालोटी गोठलवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या मालकीच्या ३३ केव्ही विद्युत वाहक तारांची चोरी झाली आहे. ही घटना ७ एप्रिल २०२५ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान घडली.

अज्ञात चोरट्याने कटरने तार कापून एकूण ९० हजार रुपये किंमतीच्या तारा चोरून नेल्या.


याबाबत सुजित चंद्रकांत शिंदे (वय ३१, सध्या रा. राधाकृष्ण नगर, बहादुरशख नाका, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, चोरट्याने ८० स्क्वेअर एम. एम. ए. सी. एस. आर. प्रकारची सुमारे १०८० मीटर लांबीची तार चोरली, ज्यामध्ये बाहेरच्या बाजूला ॲल्युमिनियम आणि आत स्टीलची तार होती. या चोरीमुळे महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.


चिपळूण पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *