चिपळूण : कन्या ऐश्वर्या जाधवने मिळवली अमेरिकेतील डी पॉल युनिव्हर्सिटी मधून सायबर सिक्युरिटी विषयात मास्टर डिग्री

banner 468x60

चिपळूणची कन्या कु. ऐश्वर्या रश्मी रवींद्र जाधव ही अमेरिकेतील डी पॉल युनिव्हर्सिटी मधून सायबर सिक्युरिटी या विषया मध्ये मास्टर डिग्री चांगल्या मार्कनी उत्तीर्ण केली. नुकताच तिचा पदवीदान समारंभ पार पडला. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


पाग बौद्ध कॉलोनीचे रहिवासी व एस. टी. चे वाहतूक नियंत्रक अधिकारी रवींद्र जाधव यांची ती कन्या आहे. ऐश्वर्याचे शालेय शिक्षण हे ख्रिस्त ज्योती चिपळूण व सिक्रेट हार्ड रत्नागिरी व फातिमा हाय स्कूल अंबरनाथ येथे झाले.

नंतर सिद्धार्थ कॉलेज मुंबईला 12 वी सायन्स उत्तीर्ण केले. सिंहगड कॉलेज लोणावळा येथे तिने कॉम्प्युटर इंजिनिअर केले आणि नंतर ती अमेरिकेत डी पॉल युनिव्हर्सिटी मधून आता सायबर सिक्युरिटी या विषयामध्ये मास्टर डिग्री फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अनेक मान्यवरांनी तीचे अभिनंदन केले असून तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *