चिपळूण : डॉ. नाजनीन चिकटे यांना कॅनडातील विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी

banner 468x60

चिपळूण शहरानजीक कळंबस्ते येथील डॉ. नाजनीन खलील चिकटे यांनी १० जून रोजी कॅनडातील प्रतिष्ठित विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


विदेशात उच्च शिक्षण पूर्ण करून मातृभूमीचा गौरव वाढवणाऱ्या डॉ. चिकटे यांचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या उल्लेखनीय यशामुळे कळंबस्ते परिसरासह संपूर्ण चिपळूण तालुक्यात अभिमानाची लहर असून, डॉ. नाजनीन यांनी तरुणांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *