Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

चिपळुण : उभ्या ट्रकवर दुचाकीस्वार आदळून तरुण जागीच ठार

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कापसाळ येथे गुरुवारी रात्री 12.30 वाजता उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून टेरव येथील तरुण ठार झाला. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


सिद्धेश दिलीप गोवळकर (22, टेरव-तांबडवाडी) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबतची फिर्याद ट्रकचालक बसप्पा भिपाप्पा पुदरीमणी (बेळगाव) यांनी दिली. ते आपल्या ताब्यातील ट्रक कापसाळ येथे रस्त्याया कडेला उभा करून झोपले होते. रात्री 12.30 वाजता पाठीमागे काहीतरी आपटल्याचा आवाज आल्याने ते जागे झाले.

यावेळी सिद्धेश याची दुचाकी आदळल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अपघातात सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *