चिपळूण : विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील तांबेवाडी (बामणोली) येथे शुक्रवारी (दि. 5 सप्टेंबर) दुपारी दुर्दैवी घटना घडली. विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी साधारण 12.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.


मृत तरुणाची ओळख सुधाकर परशुराम तांबिटकर (वय 48, रा. बामणोली, चिपळूण) अशी झाली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत प्रयत्न केले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.


गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


दरम्यान, या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *