Breaking News
चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन

चिपळूण : ‘मी उद्धव ठाकरेंसोबतच, पक्षाशी गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही’ -सचिन कदम

banner 468x60

गेली अनेक वर्षे कबड्डी क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या जिल्ह्यात एकदा तरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा व्हावी हे सर्व कबड्डीप्रेमींचे स्वप्न आहे. या वेळी ही संधी महाराष्ट्राला मिळणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ही स्पर्धा घ्यावी या विषयीच्या चर्चेसाठी पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) व उद्योजक किरण सामंत यांची भेट घेतली.

त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण सचिन कदम (Sachin Kadam) यांनी दिले. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षासोबतच असून पक्षाशी गद्दारी ही आमच्या रक्तात नाही, अशी स्पष्ट भूमिकाही जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी मंगळवारी स्पष्ट केली.

गेल्या दोन दिवसापांसून पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांची जिल्हाप्रमुख कदम यांच्या भेटीविषयाची चर्चा सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू आहे. जिल्हाप्रमुख सचिन कदम हेही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली.

त्यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर कदम यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पालकमंत्री तसेच किरण सामंत यांची भेट घेण्यामागे राजकीय हेतू नव्हता.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यात झालेली नाही. तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी देखील आम्ही सर्व एकसंघ असून होऊ दे चर्चा, या उपक्रमांतर्गत पक्षाची नाळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.

या वेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख शशिकांत मोदी, राकेश शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *