Breaking News
मंडणगड : राज्यमंत्री योगेश कदम आज मंडणगड दौऱ्यावर, जलजीवन मिशनच्या कामांचा घेणार आढावा संगमेश्वर : कोंडगाव तिठ्यावर गुरांची अवैध वाहतूक करणारी पिकअप गाडी साखरपा पोलिसांच्या ताब्यात रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने

चिपळुण : मुस्लिम दांपत्याने हिंदू मुलीचे केले कन्यादान, इमरान सय्यद यांचा आदर्शाचा नवा पायंडा

banner 468x60

समाजात धार्मिक तेढ निर्माण होत असताना, चिपळूणमध्ये एका मुस्लिम दांपत्याने सामाजिक सलोख्याचे काम केले आहे.

शहरातील गोवळकोट येथील रहिवासी इमरान सय्यद यांनी त्यांच्या घरी कार्यरत असलेल्या हिंदू मुलीचा विवाह हिंदू रीतिरिवाजानुसार स्वतःच्या खर्चाने केला. आई-वडिलांचे छत्र हरवलेली प्रतिभा लहानपणापासूनच इमरान सय्यद यांच्या कुटुंबासोबत राहिली.

घरातील कामे करता करता ती त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य बनली. आपल्या सख्ख्या बहिणीप्रमाणे असलेल्या प्रतिभेसाठी इमरान यांनी योग्य जीवनसाथी शोधून काढला आणि त्याच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती घेतली. या विवाह सोहळ्याचे आयोजन नुकतेच इमरान यांच्या निवासस्थानी करण्यात आले.


या मंगल सोहळ्यात इमरान यांचे संपूर्ण कुटुंब आनंदाने सहभागी झाले होते. त्यांनी नववधू प्रतिभाला आवश्यक असलेली आभूषणे, भेटवस्तू आणि संसारोपयोगी साहित्य प्रदान केले.

एका पित्याची भूमिका निभावत इमरान सय्यद आणि त्यांच्या पत्नीने प्रतिभाचे कन्यादान केले. या विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्चही त्यांनी आनंदाने उचलला.

गोवळकोटमधील या संवेदनशील मुस्लिम दांपत्याने केलेल्या या उदात्त कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. त्यांनी समाजाला एकजूट आणि मानवतेचा अनमोल संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *