Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील पेढांबे (विठ्ठलवाडी) येथे राहत्या घरातून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेल्याची घटना २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरीला गेला असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेढांबे विठ्ठलवाडी येथील रहिवासी प्रदीप वसंत शिंदे (वय ४५, व्यवसाय नोकरी) यांच्या आई शेवंती वसंत शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याचा हार अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेला. हा हार तीन तोळे वजनाचा असून, त्याची अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रदीप शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३४ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, सोन्याचा हार हिसकावून नेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.