Breaking News
संगमेश्वर : कोंडगाव तिठ्यावर गुरांची अवैध वाहतूक करणारी पिकअप गाडी साखरपा पोलिसांच्या ताब्यात रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संगमेश्वर : कोंडगाव तिठ्यावर गुरांची अवैध वाहतूक करणारी पिकअप गाडी साखरपा पोलिसांच्या ताब्यात

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी पिकअप गाडी साखरपा पोलिसांनी पकडली. पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गुरांसह संबंधित पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपती सावंत (वय ३९, रा. येळाणे, ता. शाहूवाडी) हा आपल्या ताब्यातील एमएच ०७ पी ३६१६ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गुरांची वाहतूक करीत होता. मुंडे तर्फे सावर्डे येथून येळाणे, तालुका शाहूवाडी येथे गुरे घेऊन जात असताना त्याचे वाहन कोंडगाव तिठा येथे आले.
यावेळी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजित पाटील हे परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यांना संबंधित वाहनातून गुरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मनस्वी पावसकर यांनी तातडीने कारवाई करत पिकअप वाहनासह गुरे ताब्यात घेतली आणि साखरपा पोलीस दूरक्षेत्रात आणली.


वाहनातील गुरांची किंमत अंदाजे २५ हजार रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव करीत आहेत.
पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात गुरांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.