Breaking News
गुहागरमध्ये कुडली-चिपळूण एसटी बसचा अपघात, स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले, चार प्रवासी किरकोळ जखमी लांज्यात मद्यधुंद व्यक्तीचा शाळेत धुडगूस, शिक्षकाला मारहाण, शिवीगाळ आणि धक्काबुक्की चिपळूण : डॉ. यतीन जाधव, त्वचा विकार तज्ञ आणि लेसर कन्सल्टंट, डॉ. वैशाली जाधव,डायरेक्टर स्प्रिंग स्किन क्लिनिक अँड लेसर इन्स्टिट्यूट यांना ‘एबीपी माझा आरोग्यरत्न सन्मान पुरस्कार’ प्रदान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान खेड : भरणे नाका येथे कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई खेड : जगबुडी नदी घाटावरून महिला बेपत्ता, खेड पोलिसांत अपहरणाची नोंद,कपडे धुण्यासाठी गेलेली महिला घरी परतलीच नाही

चिपळूण : डॉ. यतीन जाधव, त्वचा विकार तज्ञ आणि लेसर कन्सल्टंट, डॉ. वैशाली जाधव,डायरेक्टर स्प्रिंग स्किन क्लिनिक अँड लेसर इन्स्टिट्यूट यांना ‘एबीपी माझा आरोग्यरत्न सन्मान पुरस्कार’ प्रदान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

banner 468x60

चिपळूणमधील नामवंत त्वचा विकार तज्ज्ञ व लेसर-कॉस्मेटिक सर्जन डॉ. यतीन जाधव आणि स्प्रिंग स्किन क्लिनिक अँड लेसर इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. वैशाली जाधव यांना वैद्यकीय, आरोग्यसेवा आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या एबीपी माझा आरोग्यरत्न सन्मान पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ग्रँड मराठा, आयटीसी हॉटेल येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माधवबागचे संस्थापक-संचालक डॉ. रोहित साने तसेच पद्मश्री डॉ. रमण देशपांडे कॅन्सर सर्जन आणि टाटा कॅन्सर सेंटरचे भूतपूर्व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.


गेल्या सुमारे तीस वर्षांपासून चिपळूणसारख्या छोट्या शहरातून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. यतीन जाधव यांनी त्वचा विकार चिकित्सा, सौंदर्यचिकित्सा, ॲलर्जी चिकित्सा आणि औद्योगिक स्वास्थ्य या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची लेसर उपकरणे आणि अद्ययावत उपचारपद्धतींच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी लेसर क्लिनिक’ हे कोकणातील एक प्रगत उपचार केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सांगली तसेच बेळगाव परिसरातूनही रुग्ण येथे उपचारांसाठी येत आहेत.


केवळ आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता रुग्णांना योग्य उपचार, मानसिक समाधान आणि आत्मविश्वास मिळवून देण्यावर या संस्थेचा भर आहे. त्वचारोग आणि सौंदर्यचिकित्सा ही केवळ बाह्यरूपाशी संबंधित नसून व्यक्तीच्या आत्मविश्वासाशी आणि मानसिक समाधानाशी जोडलेली असल्याचे डॉ. जाधव यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.


या यशस्वी प्रवासात डॉ. वैशाली जाधव यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी प्रत्येक उपक्रमात खंबीर साथ दिली असून, हा दोघांचाही एकत्रित स्वप्नांचा प्रवास असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


स्प्रिंग क्लिनिकबरोबरच अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एजीस हेल्थकेअर, इंडस्ट्री हेल्थ या औद्योगिक स्वास्थ्य क्षेत्रातील उपक्रम आणि चिपळूणमधील माधवबाग शाखेच्या माध्यमातूनही अनेक रुग्णांना आरोग्यसेवा देण्याची संधी मिळाली आहे. या संस्थांच्या उभारणीमध्ये अनेक डॉक्टर, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या प्रवासात डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. माधव सोमण, डॉ. अश्विनी, तृप्ती भागवत, सारा निवशेकर, प्रियांका कदम, प्रतिभा, पूनम, सुप्रिया, सोनाली, दीप्ती, जयेश, दत्ताजी, ऋषिकेत, मेहंदी, सानवी ओगले, विजय कदम, पूजा, सचिन नाणिजकर, कांचन साळवी, वर्षा, मुग्धा, समृद्धी गायकर , हर्षदा, शैलेश मोरे, अविनाश पाणकर, अशोक जाधव, राजेश पवार, कुंदा, श्रेया, अकसा, नीती, संदेश, मिलिंद, पूर्वा करोडे, पायल, स्मिता मैंदरकर आणि शुभांगी शिंदे यांच्यासह स्प्रिंग क्लिनिकशी जोडलेल्या प्रत्येक सहकाऱ्याचे योगदान मोलाचे असल्याचे डॉ. जाधव यांनी विशेषत्वाने नमूद केले. संस्था एखाद्या व्यक्तीच्या संकल्पनेतून जन्माला येते; मात्र ती मोठी होते ती अनेकांच्या समर्पणातून*, या शब्दांत त्यांनी आपल्या संपूर्ण टीमप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही जाधव दाम्पत्य सक्रिय आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर,सांज सोबत,आपलं चिपळूण, एकता विकास मंच, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, स्नेहस्पर्श फाउंडेशन, फुलवा, विभा अरविंद ग्रंथालय, टच यांसारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे*.डॉक्टर म्हणून रुग्णांचे आजार बरे करण्याबरोबरच समाजाचा एक घटक म्हणून सामाजिक प्रश्नांवरही काम करण्याची जबाबदारी असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. यतीन जाधव यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनी आणि पुरस्कार निवड समितीचे आभार मानले. या पुरस्कारामागे केवळ व्यक्तीचे कर्तृत्व नसून त्यासाठी योगदान देणाऱ्या असंख्य व्यक्तींचे श्रम, विश्वास आणि समर्पण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आई-वडिलांचे संस्कार, पत्नी डॉ. वैशाली जाधव यांची साथ, सहकारी डॉक्टर, कर्मचारी, मित्रपरिवार आणि सामाजिक संस्थांमधील सहकाऱ्यांचे योगदान त्यांनी कृतज्ञतापूर्वक अधोरेखित केले. रुग्णांनी दाखवलेला विश्वास हीच आपल्या संस्थांची खरी संपत्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुरस्कार हा प्रवासाचा शेवट नसतो, तर नव्या जबाबदारीचा प्रारंभ असतो या शब्दांत त्यांनी या सन्मानामागील भावना व्यक्त केली. आजचा पुरस्कार भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि अधिक संवेदनशीलतेने आरोग्यसेवा करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
चिपळूणमधून सुरू झालेल्या वैद्यकीय सेवेच्या प्रवासाची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे चिपळूणसह संपूर्ण कोकणच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *