माणगाव : तालुक्यासाठी रविवार ठरला घातवार, दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांचा मृत्यू

banner 468x60

माणगाव तालुक्यात रविवार, १ नोव्हेंबर हा दिवस अपघातांच्या दोन दुर्दैवी घटनांमुळे घातवार ठरला. तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन महिलांचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीला दुखापत झाली आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पहिली घटना पुण्याहून माणगावच्या दिशेने येत असताना ताम्हिणी घाटात घडली. पूजा मनोज गोरे (वय २७) या दुचाकीवरून प्रवास करत असताना दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत पूजा गोरे यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेले मंजीत संजय शर्मा (वय ३२) हे जखमी झाले. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

दुसरी घटना माणगाव तालुक्यातील वडवली येथे घडली. कैसर जुल्फिकार येलूकर (वय ४०) या घरातील कचरा टाकण्यासाठी जात असताना एका टेम्पोने त्यांना धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. मात्र, या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

एकीकडे ताम्हिणी घाटातील दुचाकी अपघातात २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू, तर दुसरीकडे वडवली येथे टेम्पोच्या धडकेत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने माणगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. एकाच दिवशी दोन महिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *