मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या पिता-पुत्राला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना चिपळूण शहरात घडली. या अपघातात वडील आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर दुचाकीस्वाराने वाहन घटनास्थळीच सोडून आपल्या मित्रासह पलायन केले. ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका ते चिंचनाका मार्गावरील आनंदस् हॉटेलसमोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल सहदेव वडार आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा दुर्वांश अमोल वडार हे दोघे रात्रीच्या वेळी मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता ओलांडत होते. याचवेळी श्री अपार्टमेंट, चिपळूण येथे राहणारा प्रमोद महादेव जाधव (वय ३१) हा मोटारसायकल क्रमांक MH 08 BL 1160 घेऊन भरधाव वेगाने आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या अमोल वडार आणि त्यांच्या मुलाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमू लागल्याचे पाहून दुचाकीचालक प्रमोद जाधव आणि त्याच्यासोबत दुचाकीवर मागे बसलेला अभिजित कुळे यांनी दुचाकी घटनास्थळीच सोडून तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत गंभीर जखमी पिता-पुत्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जखमींचे नातेवाईक अक्षय नारायण कलकुटकी (वय ३५, व्यवसाय—कॉन्ट्रॅक्टर, रा. गांधीनगर, वडार कॉलनी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रमोद महादेव जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १३४(अ) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६ दाखल केला आहे.
अपघातानंतर फरार झालेल्या आरोपी चालकाचा चिपळूण पोलीस शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













