Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

चिपळूण : चुलत बहिणीकडून हापूस आंब्यांची चोरी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथील रावणीचे टेप या ठिकाणी एका महिलेने आपल्या चुलत भावाच्या मालकीच्या आंब्याच्या झाडांवरील सुमारे ७०० हापूस आंबे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

२४ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास ही चोरी झाली. मात्र, याप्रकरणी १० मे रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी मनोहर तुकाराम साबळे (वय ५६, सध्या रा. मुंबई) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही त्यांची चुलत बहीण आहे.

त्यांच्या मालकीच्या रावणीचे टेप येथील आंब्याच्या झाडांवर तयार झालेले सुमारे ७०० हापूस आंबे, ज्यांची किंमत १० हजार ५०० रुपये आहे, ते आरोपी महिलेने फिर्यादीला न विचारता आणि त्याच्या संमतीशिवाय चोरून नेले. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *