Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : न्यायालयाने सील केलेल्या घराचा सील तोडून प्रवेश, रत्नागिरीत एकाविरुद्ध गुन्हा

banner 468x60

न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आलेल्या घराचा सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जावे ग्रामपंचायत हद्दीतील कार्ला परिसरात १ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० ते २ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी राजीव कुमार विश्वेश्वर प्रसाद (वय ५१) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, कार्ला येथील ग्रामपंचायत मालमत्ता सर्वे क्रमांक १० ए, हिस्सा क्रमांक ११, १२, १३ व २० तसेच घर क्रमांक ८३० हे न्यायालयीन प्रक्रियेनुसार कोर्ट कमिशनर यांच्या आदेशाने सील करून तक्रारदार यांच्या ताब्यात देण्यात आले होते.

मात्र, दिगंबर शंकर कीर (रा. जुवे ग्रामपंचायत, कार्ला, ता. रत्नागिरी) यांनी संबंधित घरावरील न्यायालयीन सील तोडून अनधिकृतपणे घरात प्रवेश केला आणि आपल्या कुटुंबासह तेथे वास्तव्यास असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२९(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *